माडखोलकर महाविद्यालयामध्ये मतदार जनजागृती दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2025

माडखोलकर महाविद्यालयामध्ये मतदार जनजागृती दिन साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये मतदार जनजागृती दिन नुकताच साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. डॉ. गोरल यांनी यावेळी महाविद्यालयातील तरुणांनी  मतदानाबाबत दक्ष  राहणे गरजेचे असून आपापल्या गावागावात प्रबोधन करून लोकांच्या मध्ये मतदानाविषयी जागृती करणे गरजेचे असल्याचे सांगून मतदार जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.

     यावेळी प्रा. व्ही. के. गावडे यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना मतदान जागृती विषयीची शपथ दिली. यावेळी चंदगड तहसील कार्यालयाचे धर्माधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. एस. एन. पाटील  यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment