मलतवाडीचे मायाप्पा पाटील यांचे पुणे येथे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2025

मलतवाडीचे मायाप्पा पाटील यांचे पुणे येथे निधन

 

मायाप्पा चन्नाप्पा पाटील

चंदगड :  सी. एल. वृत्तसेवा

       मूळचे मलतवाडी (ता. चंदगड) व सध्या नोकरी निमित्त पुणे, साने चौक येथील रहिवासी मायाप्पा चन्नाप्पा पाटील (वय 50) यांचे अल्पशा आजाराने  रविवारी (दि. 26) दुपारी निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी (दि. 27) मलतवाडी (ता. चंदगड) येथे सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मायाप्पा हे सुरुवातीच्या काळात नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये कार्यरत होते. त्यानंतर ते अनेक विविध कंपनीमध्ये काम करत होते.

No comments:

Post a Comment