![]() |
चंदगड तहसिलमध्ये ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र कार्यशाळेत माहिती देताना तहसिलदार राजेश चव्हाण |
संपत पाटील, चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
येथील तहसिल कार्यालयामध्ये केंद्र शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाला. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात कॅम्पचे आयोजन केले जाणार असून यामध्ये सी. एस. सी. केद्रचालक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यासह अन्य स्थानिक घटकांची मदत घेतली जाणार आहे. कॅम्पच्या ठिकाणी पुरेशी जागा, पिण्याचे पाणी व अन्य सुविधा असणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागानुसार तज्ञ व्यक्तींना प्रशिक्षण दिले असून काम करताना काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित विभागाच्या तज्ञ व्यक्तीशी संपर्क साधावा. ही शासनाची योजना कालमर्यादा असल्याने त्या काळातच काम पुर्ण होणे अपेक्षित आहे. कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी असे म्हणतात. आपला चंदगड तालुका या योजनेमध्ये नंबर वन होण्यासाठी आपला प्रय़त्न आहे. यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य अपेक्षित आहे असे आवाहन तहसिलदार राजेश चव्हाण यांनी केले.
![]() |
चंदगड तहसिलमध्ये ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र कार्यशाळेत माहिती देताना नायब तहसिलदार हेमंत कामत |
![]() |
कार्यशाळेला उपस्थित अधिकारी, कर्मचारी व केंद्रचालक |
यावेळी तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, शाहू सुविधा केंद्र चालक, महा ई सेवा केंद्रचालक, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सी.एस.सी. केंद्रचालक, ग्रामपंचायत ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्देश आणि फायदे:
१) यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
२) शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
३) त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
४) सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
५) भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
६) सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना
६) थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
७) शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक
शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र:
१) आधार कार्ड
२) ७/१२ उतारा व आठ अ
३) आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
४) व्यक्ती उपस्थित असेल तर अंगठ्याने किंवा व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे.
No comments:
Post a Comment