![]() |
दाटे (ता. चंदगड) येथे चेअरमन दत्तात्रय पानसरे यांचे स्वागत करताना उदयकुमार देशपांडे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी केंद्राअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या चंदगड तालुका कृषीमाल फलोपात्पादन संघ दाटे येथील कार्यालयास महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे चेअरमन दत्तात्रय पानसरे व पणन महामंडळाच्या संचालकांनी दाटे येथील कार्यालयास भेट देऊन खरेदी केंद्र भात व नाचणी साठी शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीबाबत माहिती घेतली. एकंदर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. चेअरमन पानसरे व संचालक मंडळाचे संघाचे चेअरमन उदयकुमार देशपांडे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment