दिंडलकोप येथे ऊस तोडल्याचा जाब विचारल्यामुळे भाऊबंदकीतून मारहाण - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2025

दिंडलकोप येथे ऊस तोडल्याचा जाब विचारल्यामुळे भाऊबंदकीतून मारहाण

चंदगड : सी एल वृत्तसेवा
    दिंडलकोप (ता. चंदगड) येथे आपल्या शेतातील ऊस का तोडला असा जाब विचारल्यानंतर पती-पत्नी व मुलग्याला मारहाण केल्याची घटना घटना ७/१/२०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याबाबतची फिर्याद शितल विठ्ठल मनवाडकर (रा. दिंडलकोप) यांनी कोवाड पोलिसात दिली आहे. यावरून संशयित व फिर्यादींचे दीर मारुती शिवाजी मनवाडकर, पुतण्या एकनाथ मारुती मनवाडकर व जाऊ सुनिता मारुती मनवाडकर सर्व राहणार दिंडलकोप यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
  याबाबत कोवाड व चंदगड पोलिसातून मिळालेली माहिती अशी, घटनेतील संशयीत  व फिर्यादी एकमेकांचे भाऊबंद आहेत. फिर्यादी शितल यांचे पती विठ्ठल शिवाजी मनवाडकर हे आपला भाऊ मारुती यास आपल्या शेतातील ऊस का तोडला? असे विचारण्यास गेले असता आरोपी मारुती, त्याचा मुलगा एकनाथ यांनी शितल व विठ्ठल यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर  शीतल यांची जाऊ सुनीता हिने शितल यांचा मुलगा ओमकार याच्या डोकीत दगडाने मारले. यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३३, ११८(१), ११५ (२), ३५२ (३) (५) प्रमाणे संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने कोवाड पोलीस दुरुक्षेत्र चे हवालदार जमीर मकानदार अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment