दोडामार्ग : सी एल न्यूज प्रतिनिधी
तिलारी राखीव जंगल क्षेत्रात पाहणी करण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गांधील माशांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी झाले असून त्यांना दोडामार्ग व गोवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी घडली.
दोडामार्ग तिलारी राखीव संवर्धित जंगल परिसरातील बुडीत क्षेत्रानजीक पाहणी करण्यासाठी पाच जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांसह एकूण १२ कर्मचारी पाहणी करण्यास गेले होते. यावेळी एका झाडावरील मोठ्या गांधील माशांच्या पोळ्यातील माशांनी सर्व कर्मचाऱ्यांवर अचानकपणे जोरदार हल्ला चढवला. अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे सर्वांची एकच धावपळ उडाली. सर्वजण तिलारी धरणातील पाण्याच्या दिशेने पळू लागले. यात पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी ना दोडामार्ग तसेच मापसा गोवा येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांची वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
गंभीर जखमींमध्ये सुशांत कांबळे, बाबू देसाई आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment