तीन जिल्ह्यातील तरुण शिवरायांच्या प्रतिमेसह शिवनेरी किल्ल्यावर, चंदगड तालूक्यातील युवकाचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2025

तीन जिल्ह्यातील तरुण शिवरायांच्या प्रतिमेसह शिवनेरी किल्ल्यावर, चंदगड तालूक्यातील युवकाचा सहभाग

 


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

      जगप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहचावा तसेच शिवरायांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने अगदी चंदगड तालूक्यातील यूवका पासून कोल्हापूर व सातारा जिल्हयातील युवकांनी पुणे ते शिवनेरी असा शिवप्रतिमेसह आगळा वेगळा प्रवास केला.

     पुणे येथे व्यवसायाच्या निमित्ताने  गॅरेजमध्ये काम करणाऱ्या युवकांनी गडकोट संवर्धन करण्याचा विडा उचलला आहे. यामध्ये करवीर तालूक्यातील विनायक पाटील, भुदरगड तालूक्यातील विनायक हिलगे, सतारा जिल्ह्यातीत दत्तात्रय लोहार,  विक्रम लोहार चंदगड तालूक्यातील  कुर्तनवाडी गावचे सुजित भरमू चांदेकर, सोलापूर मधील विलास आवळे हे युवक सजवलेल्या दूचाकीवर शिव प्रतिमा ठेवून  पुणे ते शिवनेरी प्रवास करून गेले. गडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवून गडसंवर्धनाची शपथ घेतली. अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून दुर्गप्रेमी नागरिकांतून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment