वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन, चंदगड मधील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2025

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन, चंदगड मधील घटना

  

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथे सुरू असलेल्या श्री रवळनाथ यात्रेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चेन) हिसकावून अज्ञात चोराने पलायन केले. ही घटना दिनांक १९/०२/२०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

      याबाबत चंदगड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, सध्या दि १८ ते २३ रोजी चंदगड येथे श्री रवळनाथ मंदिरची वार्षिक माही यात्रा सुरू आहे. पद्मा रंगराव बिनगुणे, राहणार बालिंगा ता. करवीर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार महसूल भवन जवळ चंदगड या यात्रेच्या निमित्ताने रवळनाथ मंदिर चंदगड येथे आपल्या आई सोबत गेल्या होत्या. त्यांची आई मंदिर च्या मागील बाजूस असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली थांबल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या  गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून गर्दीचा फायदा घेत पलायन केले. याबाबत पद्मा यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ३०३ दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास पोहेकॉ परब करत आहेत.

No comments:

Post a Comment