सुंडी येथे २२ ते २७ मार्च रोजी अखंड हरिनाम पांडुरंग सप्ताह - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2025

सुंडी येथे २२ ते २७ मार्च रोजी अखंड हरिनाम पांडुरंग सप्ताह

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

        समस्त ग्रामस्थ मंडळ सुंडी (ता. चंदगड) यांच्या वतीने त्रिशतकोत्तर महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम पांडुरंग सप्ताह व तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २२ मार्च ते गुरुवार दि. २७ मार्च २०२५ (फाल्गुन कृष्ण अष्टमी ते फाल्गुन कृष्ण द्वादशी) पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह भ प वैकुंठ निवासी गुरुवर्य वाकोजी ईराप्पा पाटील यांच्या कृपाशीर्वादाने ह भ प ज्योतिबा (शैलेश) शिवाजी हन्नुरकर यांच्या अधिष्ठानाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

  कार्यक्रमाची मुहूर्तमेढ १४ मार्च रोजी ह भ प यादू गुंडू पाटील, तानाजी नारायण टक्केकर, शिवाजी पुंडलिक मोरे, विठ्ठल वाकोबा पाटील, विश्वनाथ रामचंद्र पाटील यांच्या हस्ते उभारण्यात आली. सप्ताह काळात गणेश पूजन, श्रीफळ पूजन, दीप प्रज्वलन, कलश पूजन, विना पूजन, ग्रंथ पूजन, गीता ग्रंथ पूजन, तुकाराम गाथा पूजन, तुळस पूजन, अखंड विना पूजन, मूर्ती पूजन आदी कार्यक्रम होणार आहेत. उद्घाटन सरपंच मनोहर कांबळे, उपसरपंच सौ शुभांगी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते, पारायण वाचन उद्घाटन विठ्ठल पुंडलिक पाटील, नरसू गोपाळ आंबेवडकर, दत्तू तुकाराम ढोकरे यांच्या हस्ते तर अधिष्ठान पूजन नारायण सट्टूपा पावले, निंगाप्पा गोपाळ पाटील, चंद्रकांत रामू सावंत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे पौरोहित्य राजेश नारायण कुलकर्णी (गुरुजी हलकर्णी) हे करणार आहेत.

  सप्ताह काळात रोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, ६ ते ७ झेंडावंदन, ७ ते १२ पारायण, १२ ते १ भोजन, सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ, ६ ते ७ प्रवचन, ७ ते ८ संगीत भजन, रात्री ९ ते १२ कीर्तन, रात्री १२ ते पहाटे ५ जागर भजन असे कार्यक्रम होणार असून २७ रोजी सकाळी १० वाजता महाप्रसाद होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह मंडळ पदाधिकारी यादू पाटील, काळू पाटील, विठ्ठल पाटील, तानाजी टक्केकर व ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:

Post a Comment