राजगोळी येथे अक्कामाऊली पुण्यतिथीनिमित्त २० व २१ रोजी रिंगण सोहळा व महाप्रसाद - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2025

राजगोळी येथे अक्कामाऊली पुण्यतिथीनिमित्त २० व २१ रोजी रिंगण सोहळा व महाप्रसाद

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   सालाबाद प्रमाणे राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे परमपूज्य हभप श्री गुरुमाऊली सावित्रीबाई उर्फ अक्का माऊली यांच्या ४६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २० ते शुक्रवार दि. २१/०३/२०२५ असे दोन दिवस हा कार्यक्रम साजरा होणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे गुरुवारी सकाळी ८ ते ११ अक्का माऊलींच्या पादुका व प्रतिमा तसेच ज्ञानेश्वर माऊली पालखीची ग्राम प्रदक्षिणा. ११ वाजता गुरुमाऊली दत्त भजनी मंडळ राजगोळी बुद्रुक यांच्या हस्ते अभिषेक व पूजा. दुपारी ११ ते १ रिंगण सोहळा; स्थळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम राजगोळी बुद्रुक, दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत गाव व परिसरातील भजने. सायंकाळी ७ ते रात्री ९ आयुब वाटंगी यांचे प्रवचन, रात्री ९ ते १२ ह भ प संभाजी तुकाराम चिरमुरकर महाराज कार्वे यांचे कीर्तन. रात्री १२ नंतर पहाटेपर्यंत दिंडी जागर भजने. शुक्रवार सकाळी काकड आरती व ९ नंतर महाप्रसाद. आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री अक्कामाऊली उत्सव कमिटी व ग्रामस्थ राजगोऊ बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment