चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अवैध शिकार, अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अतिक्रमण करणाऱ्यावर अनेक धाडसी कारवाई केल्या. गुन्ह्यात वापरलेले सर्व साहित्य वहानासह जप्त करून आरोपींना न्यायालयात हजर करण्याची कामगिरी करून वन खात्याची प्रतिमा उंचावल्या बद्दल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आंबा कार्यालयातील वनपाल सागर पोवार यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना २०२०-२१सालाचे वन व वन्यजीव संरक्षणार्थ उत्कृष्ट कार्याबद्दल सुवर्ण पदक जाहीर केले.लवकरच मंत्र्यांच्या उपस्थितपुरस्काराचे वितरण होणार आहे.
सागर पोवार हे सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून २२ जानेवारी २००८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वन्यजीव शाखेत दाजीपूर येथे सेवेत रुजू झाले. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी विचारात घेऊन वनविभागामार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे देय असणाऱ्या योजनांची माहिती घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. वन विभागांमध्ये अवैध्य वृक्षतोड, अवैद्य लाकूड वाहतूक, अवैद्य शिकारी, अतिक्रम होणाऱ्या ठिकाणी सतत गस्त घालून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. सन २०१५ साली त्यांची वन उपज तपासनी नाका उदगाव या ठिकाणी बदली झाली.त्यांनी २०१६ साली अवैद्य व्यवसाया बाबत पहिला गुन्हा नोंद करून दहा वाहनांवर कारवाई केली. त्याची दाखल घेऊन त्यांना शिरोळ तालुक्यातील तदलगे नियतक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला. तमदलगे बीटामध्ये असलेले अतिक्रमण काढणे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असताना त्यांनी एकाच दिवशी दोन गुन्हे नोंदवून अतिक्रमण काढून सदर अतिक्रमणामध्ये असणारे सर्व साहित्य जप्त केले.
चंदगड तालुक्यामध्ये ४ वर्ष चंदगड तालुक्यामध्ये काम केले. या कालावधी मध्ये अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या चंदगड तालुक्यातील धन दांडग्या आणि प्रतिष्ठित लोकांच्यावर, अवैद्य लाकडाची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहने लाकूड साहित्यसह जप्त करून त्यांचा लीलाव केले. वन्यप्राण्यांच्या शिकार हौसेसाठी, शूरवीर असल्याच्या दाखवण्यासाठी, तस्करीच्या उद्देशाने, मांस खाण्याच्या उद्देशाने करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून गुन्ह्यातील साहित्य जप्त करून न्यायालयात हजर केले. अतिक्रमण करणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करून अतिक्रमणामध्ये वापरलेले साहित्य जमा करून त्याचा शासकीय नियमानुसार लिलाव करून त्यापासून मिळणारा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला.
वन हद्दीत MSEB व ठेकेदार यांनी इलेक्ट्रिक पोल उभे केलेने MSEB अधिकारी व ठेकेदार यांचे वर ही गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील वाहन व पोल जप्त केले होते. त्याचं बरोबर वन व वन्यप्राणी यांचे विषयी जन जागृतीचे शाळेत व गावागावात कार्यक्रम घेऊन वनाविषयी व वन्य प्राणी यांच्याविषयी आवड निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. वन विभागाच्या माध्यमातुन लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.
वन्यप्राण्यांनी नुकसान केलेली प्रकरणे तात्काळ तयार करून विशिष्ठ कार्यालयास सादर करून तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली. तसेच गावात कोणत्याही वन्यप्राणी आलेचे समजताच तात्काळ सदर ठिकाणी जाऊन वन्य प्राणी यांच्या नैसर्गिक अधिवासात हसवण्याचे काम करत असल्याने शेतकरी व सर्वसामान्य मानुस व वन विभाग यांच्यात सालोका निर्माण होऊन वन विभागाची चांगली प्रतिमा निर्माण झाली.
चंदगड तालुक्यामध्ये रोपवनाचे काम उत्कृष्ट केले वन्य प्राण्यांसाठी वन तळ्यातील गाळ काढणे ज्या वेळी निधी उपलब्ध होत नाही त्यावेळी लोकांच्या मदतीने श्रमदानातून वनतळे यातील गाळ काढणे, पाणवठे साफसफाईची कामे चांगल्या पद्धतीने केली. तसेच इतर सर्व शासकिय यंत्रणा यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चागले संबंध ठेवून शेतकऱ्याच्या अडचणीही सोडवून देत असत.
पोवार यांनी पाच वर्षात सुमारे ५० लाखाचे गुन्ह्यातील साहित्य जप्त केले आहे. आज पर्यंत त्यांनी १५ वाहनावर अवैध वाहतूक प्रकरणी, २ शिकारी, १ शिकार प्रकरणी मदत करणाऱ्यावर, अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर जवळपास १५ गुन्हे व अतिक्रमण करणारे 3 गुन्हे दाखल केले आहेत. या त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने त्यांना सुवर्ण पदक जाहीर केले आहे. या कामी मुख्य वन संरक्षक कोल्हापूर आर. एम. रामानुजन, उपवनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद, उपसंचालक कोयना उत्तम सावंत, उपसंचालक चांदोली स्नेहलता, नवनाथ कांबळे व सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, नंदकुमार भोसले, विलास शिंदे, सोनल कोडुस्कर, प्रताप पाटील, ज्ञानेश्वर राक्षे व प्रदिप कोकितकर वन परिक्षेत्र अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व साथ मिळाली आहे.
No comments:
Post a Comment