वरगाव येथील सुधा नाईक यांची आरोग्य सेविकापदी निवड, ग्रामपंचायतीमार्फत सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2025

वरगाव येथील सुधा नाईक यांची आरोग्य सेविकापदी निवड, ग्रामपंचायतीमार्फत सत्कार

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बेरडवाडा वरगांव (ता. चंदगड) येथील सौ. सुधा किरण नाईक  यांची जि. प. सिंधुदूर्ग व जि. प. कोल्हापूर मध्ये महाराष्ट्र शासन सरळ सेवा भरती द्वारे 'आरोग्य सेविका' म्हणून निवड झाली. दाटे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सौ. नाईक यांचा सत्कार करण्यात आला. 

      दाटे ग्रुप ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी श्रीधर भोगण व उपसरपंच शंकर धुरी, ग्रा. स. संजय जाधव, संतोष मोरे, स्वाती गुरव, माधुरी मोरे, अनिता पाटील, मल्लवा नाईक, बसवाणी नाईक, सीता नाईक, कृषी अधिकारी जीवन पालमपल्ले, वरगांव पोलिस पाटील पुंडलिक नाईक यांचे उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्प देवून सत्कार करणेत आला. दुर्गम -डोंगराळ बेरड वाडा पंचक्रोशीत आरोग्यसेविका म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे कौतुक करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वि. मं. बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक  बाबुराव वरपे व  विलास सुतार  यांचेसह  विविध संस्थांचे सन्मानिय सदस्य, ग्रामस्थ, नातेवाईक, उपस्थित होते. सौ. सुधा नाईक या दाटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण नाईक यांच्या पत्नी असून सध्या त्या  अडकूर आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून रुजू झाल्या आहेत. सरपंच किरण नाईक यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment