कालकुंद्री येथे नदी घाटालगत ताम्रपर्णी नदीत बुडून एकाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2025

कालकुंद्री येथे नदी घाटालगत ताम्रपर्णी नदीत बुडून एकाचा मृत्यू


चंदगड : सी एल वृत्तसेवा
   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील हद्दीत ताम्रपर्णी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. सागर गोपाळ पाटील (वय ३६ रा. दिंडलकोप, ता. चंदगड - सध्या राहणार कालकुंद्री) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोहर शिवाजी पाटील, रा. सरस्वती नगर, कालकुंद्री यांनी दिलेल्या वर्दीवरून घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
   घटनेतील मयत सागर हा वर्दीदार मनोहर पाटील यांचा जावई असून तो गेले काही दिवस कालकुंद्री येथे राहत होता. दि. ७ रोजी मार्च रोजी मी शिनोळी येथे कामाला जात आहे असे सांगून तू घरात पण गेला होता. पण गेले आठ-दहा दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू होता. तथापि दि. १७ रोजी दुपारी दीड कालकुंद्री व कागणी या दोन नदी घाटांच्या दरम्यान नदीपात्रात कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. भारतीय दंड विधान संहिता कलम 2023 चे कलम 1994 नुसार चंदगड पोलिसात घटनेची नोंद अकस्मिक मयत म्हणून झाली आहे. सहाय्यक पोलीस फौजदार सावंत व पोलीस शिपाई कुशाल शिंदे यांच्या प्राथमिक तपासानंतर चंदगडचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर भिंगारदिवे करत आहेत.

No comments:

Post a Comment