गळफास घेऊन आत्महत्या, चंदगड तालुक्यातील बुझवडे येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2025

गळफास घेऊन आत्महत्या, चंदगड तालुक्यातील बुझवडे येथील घटना

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 
     बुझवडे (ता. चंदगड) येथे दारूच्या नशेत एकाने आत्महत्या केल्याची घटना १७/०३/२०२४ रोजी घडली. शंकर बाबू खाडे (वय ६० वर्षे, राहणार बुझवडे, ता चंदगड, जिल्हा कोल्हापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबतची वर्दी  सदाशिव रामचंद्र खाडे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
   याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत शंकर हा दिनांक १७ मार्च रोजी रात्री ८.०० वाजता घरातून निघून गेला होता. त्याचा मृतदेह १८ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास गावातील तळी नावाचे शेतातील काजूचे झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी त्यांने मद्य प्राशन केले असल्याचे समजते. पोहेकॉ मकानदार यांनी घटनास्थळी प्राथमिक तपास केल्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोहेकॉ देसाई हे अधिक तपास करत आहेत. याबाबत चंदगड पोलीसात आकस्मात मयत म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद झाली आहे.

No comments:

Post a Comment