चंदगड तालूक्यातील 31 माध्यमिक शाळांना गुरुवारी २० रोजी होणार ग्रंथदान - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2025

चंदगड तालूक्यातील 31 माध्यमिक शाळांना गुरुवारी २० रोजी होणार ग्रंथदान

 


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा 
        समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जीवन साळुंखे यांच्यामार्फत चंदगड तालुक्यातील 31 माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजना सातशे दर्जेदार व वाचणीय पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे. नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचे हस्ते हा ग्रंथदान समारंभ हलकर्णी फाट्यावरील तुळशी बाजारच्या हॉलमध्ये गुरवार दि २० रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
     नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगावच्या वतीने या कार्यक्रमाचे चंदगड तालुक्यात  आयोजन करण्यात आले आहे प्राचार्य साहित्यीक जीवन साळोखे हे गेल्या 30 वर्षापासून समृद्ध शालेय ग्रंथालय आणि वाचन प्रोत्साहनासाठी जिल्ह्यातील हजारो हायस्कूल ना सातत्याने ग्रंथ भेट देत आहेत . जिल्ह्यातील अशा हजारो माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शाळेला हजारो उपयुक्त व वाचनीय पुस्तकांची भेट दिली आहे . या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ते ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन आणि प्रमुख तत्वे व विशेष दिन यांची माहिती देणारे लॅमिनेटेड फोटो सर्व संबंधित हायस्कूल ना भेट देणार आहेत. ग्रंथदानाच्या या आगळ्या वेगळ्या  होणाऱ्या या कार्यक्रमास संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापक, एक भाषा शिक्षक व ग्रंथालय प्रमुख यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यिक जीवन साळुंखे व नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment