चंदगड, तिलारी, दोडामार्ग- पणजी बस सुरू करणे बाबत आमदारांचे आगार प्रमुखांना पत्र - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2025

चंदगड, तिलारी, दोडामार्ग- पणजी बस सुरू करणे बाबत आमदारांचे आगार प्रमुखांना पत्र

चंदगड दोडामार्ग पणजी बस सुरू करावी या मागणीचे पत्र आगार व्यवस्थापक यांना देताना लक्ष्मण गावडे व इतर

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   तिलारी- दोडामार्ग घाटातील नादुरुस्त रस्त्यामुळे येथील एसटी बस वाहतूक गेल्या जून महिन्यापासून तब्बल दहा महिने उलटले तरी बंद आहे. दरम्यान चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून घाटातील दरड कोसळलेला भाग फेब्रुवारी महिन्यात दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून एसटी बस किंवा अन्य वाहने धावण्यास काही अडचण नाही. तथापि दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप मार्गावरील एसटी बस वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी मार्गावरील प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे. हे ओळखून आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळ चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांना घाटातील रस्त्याची पाहणी करून चंदगड दोडामार्ग पणजी बस सुरू करावी अशी विनंती केली आहे. आमदारांच्या वतीने हे पत्र सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी नुकतेच आगार व्यवस्थापक यांना दिले. यामुळे येत्या दोन दिवसात या मार्गावरील वाहतूक सुरू होईल अशी आशा प्रवासी वर्ग बाळगून आहे.

No comments:

Post a Comment