चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ऐतिहासिक गडकोटांचे जतन व संवर्धनासाठी जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान तसेच चंदगड तालुका आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'शौर्या तुला वंदितो' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माडखोलकर महाविद्यालय चंदगड च्या सभागृहात १ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समरसेनानींचा कृतज्ञता सन्मान तसेच भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहणारे आणि देश सेवेसाठी सर्वस्व आपण केलेल्या वीर जवान, वीर माता, वीर पत्नी यांच्यासह सामाजिक बांधिलकीतून विविध क्षेत्रात कार्य करणारे तालुक्यातील समाजसेवक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान सोहळा होणार आहे.
प्रा. डॉ. एस. डी. गोरल र. भा. माडखोलकर महाविद्यालय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी चंदगड नंदकुमार भोसले उपस्थित राहणार असून यावेळी प्रा. एन एस पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. चंदगड तालुक्यात अशा प्रकारचा पहिल्यांदाच होणारा हा कार्यक्रम असून यावेळी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर तसेच आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन चंदगड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment