चंदगड/प्रतिनिधी
माजी विद्यार्थी मेळाव्यातून जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. महाविद्यालयाचा विकास साधण्याचा प्रयत्न माजी विद्यार्थ्यांकडून झाला पाहिजे. माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करावे, त्यांना प्रेरणा द्यावी, बाहय जगाचे ज्ञान द्यावे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे'. असे प्रतिपादन डॉ. राजेश घोरपडे यांनी केले. ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उपप्राचार्य प्रा आर बी गावडे, सचिव संतोष सुतार ,डॉ मोहन घोळसे, प्रा पी ए कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी कमिटीचे प्रमुख प्रा. सुधाकर तावदारे यांनी केले. यावेळी डॉ. मोहन घोळसे, डॉ. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. अजय पाटील, संतोष सुतार, प्रा. पी ए कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणीना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या आदर्श माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री संजय पाटील यांनीही माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. इंग्रजी विषयात पीएच. डी. प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. व्ही. व्ही. कोलकार यांचा आदर्श माजी विद्यार्थी संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी संघटनेकडून महाविद्यालयास १ लाख रुपये किंमतीचा ६५ इंची स्मार्ट टीव्ही देण्यात आला.
अध्यक्ष मनोगतात बोलताना प्राचार्य डॉ बी डी अजळकर म्हणाले, 'महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. आपल्या कॉलेजचे नाव विविध क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी मोठ केलं आहे. सर्वांचे योगदान महाविधालयाच्या वाटचालीत मोलाचे आहे. यशस्वी विद्यार्थी घडवणे हाच आमचा कायमचा ध्यास आहे.' या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनासाठी दौलत विश्वस्थ संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील व संचालक मंडळाचे प्रोत्साहन मिळाले. यावेळी उपप्राचार्य प्रा. आर. बी. गावडे, प्रा. डॉ. आय आर जरळी, डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. एस. आर. वायकर, प्रा. एन. के. जावीर प्रा अंकुश नौकूडकर प्रा शाहू गावडे प्रा एस बी कांबळे प्रा सुनिल पाटील, प्रा पंकज कांबळे तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन व सर्वांचे आभार प्रा एस डी तावदारे यांनी मानले.
No comments:
Post a Comment