कालकुंद्रीतील बदाम या शर्यतीच्या बैलाच्या सन्मानार्थ मोदगे येथे 3 मे पासून बैलगाडा शर्यत, दीड लाख रुपयांची बक्षिसे, बदाम प्रेमींची हौसच न्यारी - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2025

कालकुंद्रीतील बदाम या शर्यतीच्या बैलाच्या सन्मानार्थ मोदगे येथे 3 मे पासून बैलगाडा शर्यत, दीड लाख रुपयांची बक्षिसे, बदाम प्रेमींची हौसच न्यारी

कालकुंद्री : जोतिबा पाटील व रामचंद्र पाटील यांच्याकडील बदाम हा शर्यतीचा बैल.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा / विशेष प्रतिनिधी
     चंदगड तालुक्यामध्ये शर्यतीच्या बैलावरील प्रेमापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांकडून होत आहे. आपल्या कुटुंबीयातील एका सदस्य प्रमाणे अशा शर्यतीच्या बैलांची जोपासण ही अगदी प्रेमाने केली जाते. असेच एक उदाहरण म्हणजे हल्लारवाडी ता चंदगड येथील विशाल हेळवे यांच्या पुढाकाराने व कालकुंद्री (ता. चंदगड) येथे बदाम या शर्यतीच्या बैलाची जोपासण करणारे जोतिबा कलाप्पा पाटील व रामचंद्र कलाप्पा पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने   बदाम या बैलाच्या सन्मानार्थ  मोदगे (ता. हुक्केरी ) येथे शनिवारी (दि. 3) ते रविवारी (दि. 4) यादरम्यान बदाम हिंदकेसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 
विशाल हेळवे
     सदर शर्यतीचे उद्घाटन टीडीएफ, महाराष्ट्र राज्य चे कार्याध्यक्ष नरसु पाटील, कालकुंद्रीचे उपसरपंच संभाजी पाटील, कालकुंद्री ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, मोदगेचे माजी सरपंच शरद पाटील, मोदगे येथील आयुर्वेदिक तज्ञ रामा वडर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती भरमाना गावडा, हल्लारवाडी (ता. चंदगड ) येथील माजी सरपंच शशिकांत हेळवे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शर्यतीचे उद्घाटन होणार आहे. या शर्यतीमध्ये विजेत्याना अनुक्रमे 21 हजार रु., 18 हजार, 15 हजार,  13 हजार, 11 हजार, 9 हजार, 7 हजार, 6 हजार,  5500, 5000, 4500, 4000, 3500, 3000, 2500 अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेचे समालोचक म्हणून किरण भिसे (कराड),  एकनाथ कांबळे ( माजी सरपंच, हलकर्णी ), भरत कांबळे ( हेब्बाळ ) हे करणार आहेत, तर टाईम कीपर म्हणून उमेश दड्डीकर व विनायक पाटील (रा. तेउरवाडी ) हे जबाबदारी पार पाडणार आहेत.
     या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य संचलित चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुका बैलगाडा शर्यत संघटना यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.  अधिक माहितीसाठी विशाल हेळवे मोबाईल क्र.  9975337260,  कल्लाप्पा पाटील मोबाईल क्र. 8308271825 यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 बैलगाडा शर्यत आयोजित करून हौशी मालक तसेच बैलप्रेमी यांना एक व्यासपीठ मिळावे, या हेतूने मोदगे येथे सदर स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक तसेच अन्य कोणत्याही राज्यातील बैल सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी संपर्क साधावा..............
विशाल हेळवे (शर्यत संयोजक, हल्लारवाडी, ता. चंदगड)

No comments:

Post a Comment