चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील दाटे केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ शोभाताई दत्तात्रय देसाई (मुळगाव उचगाव, ता. जि. बेळगाव) यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सौ देसाई या नियत वयोमानानुसार ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त २६ एप्रिल रोजी स्वराज्य मंगल कार्यालय कार्वे, ता. चंदगड येथे त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्राथमिकशिक्षक समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात चंदगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील व चंदगड पंचायत समितीच्या माजी उपसभापती मनीषा शिवनगेकर यांच्या हस्ते शोभाताई व त्यांचे पती दत्तात्रय देसाई या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक न. ल. पाटील यांनी केले. सौ देसाई यांनी प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख म्हणून ३९ वर्षे सेवा केली. त्यांच्या सेवेची सुरुवात जानेवारी १९८६ मध्ये बटकनंगले (ता. गडहिंग्लज) शाळेत शिक्षिका म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी अमरोळी, अडकुर, देवरवाडी, कागणी, महागाव, कानूर, शिनोळी खुर्द, तेऊरवाडी येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर त्या पदोन्नतीने गोकुळ शिरगाव शाळा नंबर २ च्या मुख्याध्यापिका झाल्या. येथे सहा वर्षे सेवेनंतर त्या सहा महिन्यांपूर्वीच केंद्रप्रमुख म्हणून दाटे येथे रुजू झाल्या होत्या. विशेष म्हणजे ३१ मे २०२५ ही त्यांची सेवानिवृत्तीची तारीख असताना त्यांना गडहिंग्लज तालुक्यात विस्तार अधिकारी म्हणून आज म्हणजेच ३० रोजी तिसरी पदोन्नती मिळाली आहे. हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात घडवलेले अनेक विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रात चमकत आहेत.
दाटे केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासह माजी सभापती यशवंत सोनार, शंकर मनवाडकर, सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष शि. ल. होणगेकर, वसंत जोशीलकर, विविध शिक्षक संघटना, पतसंस्थांचे पदाधिकारी, देसाई कुटुंबीयांचे नातलग सुमित भास्करराव पाटील (शिवसेना संपर्कप्रमुख दिंडोरी लोकसभा नाशिक), ईश्वर भास्करराव पाटील, शरद ढोकरे अश्विन भोसले, उत्तमराव दवंगे (द्राक्ष बागायतदार नाशिक), मोतीराम गणपतराव देसाई (गणेश दूध संस्था संस्थापक उचगाव), चंद्रकांत देसाई (सुमंत इंटरप्राईजेस पुणे), उदयसिंग सिताराम देसाई, प्रताप सिंह सिताराम देसाई, एन डी साळवी (केंद्रप्रमुख सडोली), आर आर पाटील (केंद्रप्रमुख कणेरी), एन जी ननवरे (केंद्रप्रमुख करवीर), पा ल मुळीक, शिक्षक संघ अध्यक्ष शिवाजी शंकर पाटील, सदानंद पाटील, व्याही- ईश्वर पाटील, अश्विन भोसले, रमेश अण्णा बोरसे, चिन्मय आडके, राहुल सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, माजी सभापती यशवंत सोनार, कुमारी परिधी पवन देसाई, राहुल चिक्कोडे, आर टी जाधव, केंद्रप्रमुख गोपाळ जगताप, एस के पाटील, शंकर सूर्यवंशी, बाबू परीट (संचालक शिक्षक बँक) आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी पाटील व अनंत धोत्रे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पाटील, नागोजी भोसले, विश्वनाथ गावडे, सुरेश पाटील, आदींसह दाटे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment