कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५० वर्षे पूर्ती निमित्त सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ४ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता संस्था इमारतीत होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील हे भूषवणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा निबंधक अरुण पां. काकडे, तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरचे उपप्राचार्य डॉ. एस. टी. जाधव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी चंदगडचे सहाय्यक निबंधक ए. एस. काटकर, कर सल्लागार विजय हरगुडे, प्रमाणित लेखापरीक्ष ए. बी. देवेकर, जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. एस. देसाई, चंदगड तालुका पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष शांताराम भिंगुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन वाय. आर. बामणे, मॅनेजर बाळकृष्ण नागरदळेकर व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment