चंदगड : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीचा निकाल कधी जाहीर करणार? याची विद्यार्थी व पालकांना उत्सुकता लागून राहिली आहे. बोर्डाच्या विश्वसनीय सूत्रानुसार हा निकाल मे महिन्याच्या २० ते २५ च्या दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in या वेबसाईटवर त्यांचे रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून ऑनलाईन तपासू शकतात. यंदा या परीक्षेत एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार १२० मुले तर ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते.
No comments:
Post a Comment