![]() |
शिवाजी पाटील |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
राजगुळी खुर्द (ता. चंदगड) येथील निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी लक्ष्मण पाटील यांचे दिनांक 4 मे 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, पुतणे, सुना असा परिवार आहे. ते तेऊरवाडीचे प्रथम शिक्षक मुख्याध्यापक कै. लक्ष्मण आप्पाजी पाटील यांचे ते चिरंजीव होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती.
त्यांचा दुर्मिळ पुस्तकांचा प्रचंड मोठा संग्रहालय आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळ गावी राजगोळी खुर्द येथे त्यांचे पुतणे डॉ. विनायक पाटील, विश्वनाथ पाटील, डॉ. राहुल पाटील, विशाल पाटील हे या सर्व दुर्मिळ पुस्तकांचे ग्रंथालय उभे करणार आहेत, जेणेकरून राजगोळी पंचक्रोशीतील वाचन प्रेमींना लाभ घेता येईल. हे ग्रंथालय शिवाजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व त्यांच्या आत्तापर्यंतच्या शैक्षणिक योगदानाचा, कार्याचा सन्मान म्हणून उभे केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment