कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
८ मे ते १२ मे २०२५ रोजी माडवळे (ता. चंदगड) येथे रामलिंग देवालय वास्तुशांती व कळसारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माडवळे ग्रामस्थ, भाविक भक्तजन, दानशूर व्यक्ती, माहेरवाशिणी यांच्या देणगीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे.
कार्यक्रमानिमित्त पाच दिवस गावात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दि. ८ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मुहूर्तमेढ व अभिषेक, शुक्रवार दि. ९ रोजी वास्तुशांती, गृहप्रवेश, कलश स्थापना, गणेश पूजन, वास्तू देवता, शय्याधिवास आदी कार्यक्रम होणार आहेत, शनिवार १० रोजी दिवसभर कळस व कलश मिरवणूक सोहळा व सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, रविवार ११ रोजी सकाळी कळसा रोहन, देवता पूजन, होम हवन, बलिदान, पूर्णाहुती, प्राणप्रतिष्ठा, कलश स्थापना, अभिषेक, आशीर्वचन व महापूजा तर सोमवार दिनांक १२ रोजी दुपारी १२.०० वाजल्यानंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
मंदिराच्या बांधकामसाठी इंजिनिअर संदीप पाटील (नेसरी), कळस शिल्पकार संतोष गाडीवड्डर (बेन्नाळी), गाभारा कारागीर राजू लाळगे, सुभाष निरलगी, बांधकाम कारागीर बाळकृष्ण कणबरकर (होनगा), कळस कारागीर शंकर निळकंठ एकरदावर (खनदाळ) यांनी योगदान दिले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, सत्तेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या मंगलमय धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा. असे आवाहन रामलिंग देवालय ट्रस्ट, ग्रामपंचायत व देवालय जीर्णोद्धार कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment