कडलगे बुद्रुक येथील एम. टी. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2025

कडलगे बुद्रुक येथील एम. टी. पाटील यांचे निधन

 


एम. टी. पाटील

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
      कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच एम. टी. पाटील उर्फ मष्णू तुकाराम पाटील (वय 78) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 3) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 5) सकाळी होणार आहे. ते गावातील रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अनेक वर्षे चेअरमन होते. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. शिनोळी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतमधील ॲटलास या कंपनीचे कर्मचारी प्रमोद पाटील व गडहिंग्लज, चर्च रोड येथील श्री गणेश कार सर्विस सेंटरचे मालक अजित पाटील यांचे ते वडील तर गडहिंग्लज पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार अंजली पाटील यांचे ते सासरे होत. कार्वे (ता. चंदगड) येथील पत्रकार व गोकुळ सहकारी दूध संघाचे सीनियर  सुपरवायझर (विस्तार विभाग) निवृत्ती हरकारे यांचे ते सासरे तर कालकुंद्री येथील सरस्वती हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक एन. जे. बाचुळकर (कागणी) यांचे ते चुलत सासरे होत.
एम. टी. पाटील हे इंग्रजी विषयाचे तज्ञ व ख्यातनाम माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांचा परिचय होता. शिवणगे (ता. चंदगड) येथे अनेक वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. या गावातीलच ताम्रपर्णी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते.

No comments:

Post a Comment