हलकर्णी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2025

हलकर्णी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा



चंदगड / प्रतिनिधी
     हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.  दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील , सचिव विशाल पाटील ,प्राचार्य डॉ बी डी अजळकर , उपप्राचार्य प्रा आर बी गावडे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत शेंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी केले. यावेळी इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शारीरिक शिक्षण संचालक प्रा कैवल्य काळे यांनी सूत्रसंचालन केले तर  आभार उपप्राचार्य प्रा आर बी गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment