चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड तालूक्यातील सर्व युवकांचा आधारवड ठरलेले आणि कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात बीएबीएड विभागात मराठी विभाग प्रमुख असणारे नागनवाडी (ता चंदगड ) गावचे सुपूत्र , एक लेखक व कवी प्रा डॉ गोपाळ ओमाना गावडे शुक्रवार दि 31 मे रोजी सेवानिवृत्त होत . यानिमित्य कोल्हापूर येथे मांगल्य मल्टीपर्पज हॉल येथे दि 30 रोजी सकाळी १० वाजता महराष्ट्र केसरी पै विष्णू जोशिलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांच्या कार्याचा आढावा
प्रा. (डॉ.) गोपाळ ओमाणा गावडे,
:- मु. पो. नागणवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर
:- इंद्रगोप, पद्माराजे सोसायटी, राजाराम तलावाजवळ, कंजारभाट वसाहत, उजळाईवाडी ता. करवीर
:- शिक्षण : एम.ए.,एम.एड., पीएच.डी.
:- १९९१ पासून महावीर महाविद्यालय, कोल्हापूर बी.ए.बी.एड. विभागाकडे मराठीचे प्राध्यापक.
:- पीएच.डी विषय : मामा वरेरकर यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास
:- मराठी विभाग प्रमुख, महावीर महाविद्यालय २०१० ते ३१ मे,२०२५
:- महावीर महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य २००५ ते २०१०
:- प्रभारी प्राचार्य महावीर महाविद्यालय १/१/२०१० ते ७/७/२०१०
:- समन्वयक, बी.ए.बी.एड. विभाग २००७ ते २०१२
:- चेअरमन: मराठी अभ्यास मंडळ महावीर महाविद्यालय, कोल्हापूर. २०२२ ते ३१ मे,२०२५
:- महावीर महाविद्यालयाच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य २०२२ ते २०२४
:- शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य २०१७ ते २०२२
:- कोल्हापूर शहर समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर २०१४ ते २०१९
:- चेअरमन : श्री आचार्य देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सह. पतसंस्था, कोल्हापूर. २०१२ ते २०१७
:- श्री.पद्मश्री रणजीत देसाई नागरी सह. पतसंस्था, मर्या.,कोल्हापूर. (सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन)
:- नागणवाडी सोसायटी सदस्य २००९ ते २०१४
:- खजिनदार, श्री पद्माराजे हौसिंग गृहनिर्माण सोसायटी, उजळाईवाडी, ता. करवीर
प्रकाशित पुस्तके
१) बाई शेवंती फुललेयी (चंदगड परिसरातील लोकगीतं)
२) प्रयोगाची नांदी : मामा वरेरकर
३) 'उंबळट' (चंदगडी बोलीतील व्यक्तिचित्रणे)
४) मराठी प्रेम कविता : अस्तित्ववादी दृष्टिकोनातून
पुरस्कार:
१) बाई शेवंती फुललेयी या पुस्तकाला २०१५ सालचा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा,कोल्हापूर यांचा प्रा. मंदा कदम उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कार.
२) 'उंबळट'ला २०२३ सालचा शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्यावतीने दिला जाणारा 'शिविम साहित्य पुरस्कार'
३) उंबळट'ला २०२३ सालचा करवीर साहित्य परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
४) उंबळट'ला २०२३ सालचा गंगामाई वाचनालय, आजरा यांच्यावतीने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट साहित्यकृतीचा राज्यस्तरीय पुरस्कार.
कोल्हापुरात राहूनही चंदगडी लोकगीतांचे जतन करण्यासाठी अविरत प्रयत्नातून लोकगीते संकलित केली. ती बाई शेवंती फुललेयी या पुस्तक रूपाने प्रकाशित केली. त्याचबरोबर चंदगडी भाषा कायमस्वरूपी साहित्याच्या माध्यमातून टिकून राहावी यासाठी चंदगडी बोली भाषेत उंबळट हे व्यक्तीचित्रण प्रकाशित केले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहचलेले प्रा डॉ गावडे चंदगडी युवकांच्या मदतीला नेहमीच धावून जात . केवळ चंदगडच नव्हे तर महाविद्यालयात येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना डॉ गावडे यांचा लळा होता . कोणतीही अडचण आली की डॉ गावडे याना फोन केला की मग ती अडचण क्षणात दूर . मग कोल्हापुरात राहण्याची असो की जेवणाची . त्यांनी चंदगडच्या हजारो युवकांना आतापर्यंत आश्रय दिला . मराठी विषयाचे गाढे अभ्यासक लेखक आणि एक विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे . संघर्षाची तमा न बाळगता हाताला मिळेल ते काम करून शिक्षणासाठी चंदगड तालूका सोडला . पण गावची माती अन नाती ते कधीच विसरले नाहीत . पेनाला धरलेल्या हातानी या महाराष्ट्रातील हजारो जनांना उत्तम शिक्षक च नाही हजारो अधिकारी घडवले . पुस्तक , खडू फळा या त्रिकोणाने विद्यार्थ्यांच्या जगण्याचा चौरंग सप्तरंगी केला . अशा अभ्यासू , मनमिळावू , कुंटूंब वत्सल , विद्यार्थि प्रिय , संवेदनशिल व्यक्तिमत्व असलेल्या प्रा डॉ गोपाळ गावडे यांच्या सेवानिवृत्तीला चंदगड लाईव्ह न्यूजच्या लाख लाख शुभेच्छा.
No comments:
Post a Comment