आरोपी व जप्त केलेल्या मुद्देमाला सोबत राज्य उत्पादन शुल्केचे अधिकारी व कर्मचारी
आजरा : गोपाळ गडकरी / सी एल न्यूज
राज्य उत्पादन शुल्क पथक क्र.२ गडहिंग्लज यांना मिळालेल्या माहिती प्रमाणे गडहिंग्लज - चंदगड रोड शिप्पूर तर्फ नेसरी जवळ तपासणी करत असताना खात्रीशीर मिळालेल्या बातमी नुसार येणाऱ्या एक चारचाकी वाहन मारुती सुझुकी कंपनीची एस प्रोसो वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात विक्रिसाठी असणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्याचे १६ बॉक्स व चारचाकी वाहन असे मिळून एकूण ६,५४५२० /- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी क्र १ प्रकाश बळीराम चव्हाण, रा. कोणीकोणूर, ता. जत, जि. सांगली व आरोपी क्र.२ अनिल विकास सोलनकर रा. माडग्याळ, ता. जत जि. सांगली असे दोन आरोपीना अटक करून मा.गडहिंग्लज न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास कामासाठी पथक जत, जि. सांगली येथे रवाना झाले.
आरोपी क्र १ यांचे कोणीकोणूर ता. जत येथील हॉटेल गोटू ( जान्हवी ) मध्ये तपासणी केली असता गोवा बनावटीचा मद्याच्या मॅक्डोवल नं.१ रिझर्व व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 32 सिलबंद बाटल्या मिळाल्या. तसेच वापरले जाणारे स्टिकर मॅक्डोवल नं.१ रिझर्व व्हिस्कीच्या 180 मिलीच्या बाटल्यांना चिकटवण्याचे 1000 बनावट लेबले, इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की 180 मिलीचे स्टिकर 2000 बनावट लेबल व बाटल्यांच्या टोपणांवर लावण्यासाठी UNITED SPIRITS LIMITED, BARAMATI FOR MAHARESHTRA असे घोषवाक्य असलेले 500 बनावट प्लास्टिक स्टीकर मिळून आले, तपासा दरम्यान असे आढळून आले की गोवा बनावट दारूच्या बाटलीवर चिटकवलेले लेबल काढून त्यावर महाराष्ट्र राज्यात विक्रिसाठी असलेले लेबल चिटकवून मद्य विक्री करत असे हुबेहुब दिसणारे स्टिकर व लेबल हे संकेत संजय मुळावकर रा. जोडभावी पेठ, ता. सोलापूर जि. सोलापूर यांच्याकडून तयार करून घेतलेचे तपासा दरम्यान समजले त्यासाठी आरोपी संकेत मुळावकर यांच्या राहते घराचा शोध घेऊन त्याचे घरी जाऊन चौकशी कामी ताब्यात घेतले
सदर गोवा बनावट मद्य हे गोवा येथील वसंत जगन्नाथ मालिक (बंटी वाईन्स) मधून खरेदी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे लेबल चिटकवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसुल बुडवला. या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. सदर गुन्ह्यात आतापर्यत रू.६ ८६ ६४० /- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई मध्ये पोलीस निरिक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरिक्षक सत्यवान भगत व संदिप जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केरकर, जवान देवेंद्र पाटील, आशिष पोवार, आदर्श धुमाळ, सुशांत पाटील, यांचा सहभाग आहे. सदर तपासकामी प्रभात सावंत (निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जत, जि. सांगली), व त्यांचा स्टाफ तसेच सोलापूर जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी तसेच जवान चेतन वंगुन्ति, पांढरे, श्रीमती सलगर यांचे सहकार्य मिळाले. पुढील गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत.
No comments:
Post a Comment