कोवाड : सी एल वृत्तसेवा
पंचायत समिती चंदगडचे शिक्षण विस्तार अधिकारी नारायण विठोबा पाटील तथा एन. व्ही. पाटील हे आपल्या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्त त्यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार व सदिच्छा सोहळा १ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता रणजीत देसाई सांस्कृतिक भवन, तेऊरवाडी रोड, कोवाड येथे आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक समितीचे चंदगड तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कार्यक्रमात शिक्षक समितीचे राज्य नेते शंकर मनवाडकर यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार होणार आहे.
यावेळी एम. जे. पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण, शांताराम पाटील, बंडोपंत चिगरे, यशवंत सोनार, शंकरराव आंबेवाडकर, चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, शिरोळच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, गुरुवर्य बी. एस. अंगडी, गुरुवाना पाटील. दत्तात्रय पाटील, अशोक ज्योतिबा पाटील, प्रकाश दळवी, एन. एस. पाटील (तेऊरवाडी) आदी मान्यवरांसह पंचायत समिती चंदगड व पंचायत समिती शिरोळ येथील शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन एन. व्ही. पाटील यांचे कुटुंबीय, तेऊरवाडी ग्रामस्थ, एकता फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment