कोवाड : सी एल वृत्तसेवा
आर्थिक पाठबळ देऊन कोवाड व परिसरातील व्यापारी बंधू तसेच सभासदांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या रौप्य महोत्सवी दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोवाड (ता. चंदगड) या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
संस्था कार्यालय निट्टूर रोड- कोवाड येथे होणाऱ्या सभेसाठी संस्थेच्या सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन दयानंद मोटूरे, व्हा. चेअरमन उत्तम मुळीक, मॅनेजर मनोहर पाटील यांनी केले आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले मान्यवर व उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment