मेजर ध्यानचंद यांची कामगिरी भूषणावह व प्रेरणादायी - डॉ. एस.एन पाटील, चंदगड माडखोलकर महाविद्यालयात क्रीडा दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2026

मेजर ध्यानचंद यांची कामगिरी भूषणावह व प्रेरणादायी - डॉ. एस.एन पाटील, चंदगड माडखोलकर महाविद्यालयात क्रीडा दिन उत्साहात

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या खेळात जी कामगिरी केली ती संपूर्ण देशाला भूषणावहआहे. हॉकीचा हा महान जादूगार प्रत्येक खेळाडूला प्रेरणा व स्फूर्ती देणारा आहे."असे प्रतिपादन डॉ एस. एन. पाटील यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील क्रीडा दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

    ते पुढे म्हणाले की,"ध्यानचंद यांनीखेळातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांची खिलाडूडू वृत्ती आणि देशप्रेम यादोन्हीगोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. हिटलरनेदेऊ केलेले फील्डमार्शल पद नाकारून त्यांनीदेशासाठी खेळणे पसंत केले. त्यांच्या कामगिरीमुळे भारताने 1928, 1932 आणि 1936 अशा सलग ३ ऑलिपिक स्पर्धामध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. आजच्या काळातयुवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.

    अध्यक्षस्थानावरून बोलतानाप्रा व्ही. के. गावडे यांनी" मेजर ध्यानचंद यांनी आपल्या कृतीतूनच संदेश दिला आहे. तरुणांनी गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता या ऑलिंपिक ब्रीद वाक्याचा विचार करावा आणि आपल्याला जे सर्वोत्तम देता येण्यासारखे आहे. त्यासाठी कसून मेहनत करावी हा संदेश निश्चितच ध्यानात घेण्यासारखा आहे." असे मत व्यक्त केले. क्रीडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी आभार मानले.

    कार्यक्रमाला शोभा अरबळी, वैशाली दावणे, डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एन. एस .मासाळ, एन. पी. चांदेकर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment