![]() |
कालकुंद्री येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील लोक देणगीतून बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकामचा पहिला वर्धापन दिन शनिवार व रविवार दि. १० व ११ मे रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १० रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक, यानंतर रामराव पाटील, जयवंत गोपाळ पाटील, विलास शेटजी व जयराम भरमू पाटील यांच्या हस्ते पुजा. सकाळी १० ते १२ दिंडी मिरवणूक, दुपारी १ ते ३ भजन, सायंकाळी ४ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते १२ राजीव सुतार (सांगवडे, जि. सांगली) यांचे कीर्तन.
रविवार दि ११ रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, ८ वाजता महाआरती, सकाळी १० वाजल्यापासून महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी पाच वाजता सौ सुप्रिया सुहास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कृतज्ञता कार्यक्रम. तर रात्री ९ वाजता दुर्गुळवाडी (ता. करवीर) येथील मंडळाचे प्रबोधनपर विनोदी भारुडी भजन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रमाकांत कोकितकर यांच्या हस्ते सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. कोवाड येथील जयदेव स्वामी यांच्या पौरोहित्याखाली होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment