चंदगड : सी एल वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे ग्रामस्थांच्या अधिपत्याखाली बुधवार दिनांक ०७/०५/२०२५ ते शुक्रवार दि. ०९/०५/२०२५ अखेर अखंड हरीनाम सप्ताह आयोजित केला आहे.
७ रोजी पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ९ वाजता मुहर्त मेढ, दुपारी भजन, सायंकाळी ४ ते ६ हरीपाठ, सायंकाळी ६ ते ७ प्रवचन, रात्री ९ ते १२ निरूपन रात्री १२ नंतर हरि जागर.
दि. ८ रोजी पहाटे ४ ते ६ काकडा, दु. १ वा. भजन, ४ ते ६ हरीपाठ, रात्री ९ वाजता हभप श्री. दुर्गेश महाराज खांडेकर (चिरमुरी) यांचे कीर्तन, रात्री हरीजागर.
दि. ९ रोजी सकाळी ९.१५ वाजता दिंडी सोहळा व गंगापुजन, १० वाजता सत्यनारायण पुजा, महाआरती व गाऱ्हाणा, ११.३० नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन माऊलीदेवी जिर्णोध्दार कमिटी, ग्रामस्थ नांदवडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment