सह्याद्री प्रतिष्ठान व सैनिक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2025

सह्याद्री प्रतिष्ठान व सैनिक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
     चंदगड तालुक्यातील आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समर सेनानी व चंदगड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आयोजित 'शौर्या तुला वंदितो' कार्यक्रम उत्साहात पार पडला. र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. डी. गोरल तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एन. एस. पाटील उपस्थित होते. 

   महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित  कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. दीप प्रज्वलन व  छ. शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उद्योजक लक्ष्मण गावडे, वन विभाग पाटणे परीक्षेत्र चे रेंजर प्रशांत आवळे चंदगड चे रेंजर नंदकुमार भोसले यांच्या हस्ते झाले. 

  यावेळी उपस्थित चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात युद्धात सहभागी झालेले सैनिक, शहीद सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सैनिकांच्या संदर्भात विविध मागण्या अग्रक्रमाने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  


     आमदार पाटील, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, रेंजर नंदकुमार भोसले, प्रशांत आवळे लक्ष्मण गावडे, एन एस पाटील यांच्या हस्ते वीर जवान, वीर माता, वीर पत्नी यांच्यासह सामाजिक बांधिलकीतून विविध क्षेत्रात कार्य करणारे तालुक्यातील समाजसेवक  यांचा मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उद्योजक सुनील कानेकर, सुरेश सातवणेकर, शिक्षक संघाचे अध्यक्ष सदानंद पाटील, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आदिल6श्रम मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बेळगाव येथील संस्थेच्या वतीने दाखवण्यात आलेली चित्त थरारक मल्लखांब प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली.

     कार्यक्रमाचे स्वागत माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी राजाराम मोहनगेकर निवृत्ती मसूरकर आदींनी केले प्रास्ताविक सैनिक संघटनेचे सचिव कपिल गवस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक गणेश मांगले, संतोष मालुसरे, निवृत्ती कुट्रे, गोविंद मासरणकर, संतोष सुतार, राजू गावडे, गणपती सावंत आदींसह माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment