![]() |
चंदगड आगारात नवीन आलेल्या बसचे लोकार्पण करताना चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांच्यासह मान्यवर आगारातील अधिकारी कर्मचारी व प्रवासी वर्ग. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
एसटी महामंडळाच्या चंदगड आगाराच्या ताफ्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन बस गाड्यांची भर पडली आहे. सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या या नवीन गाड्या कार्यान्वित करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे.
तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड आगाराला एसटी बस मिळाव्यात अशी मागणी काही दिवसांपूर्वी शासनाकडे केली होती. नव्या एसटी बस आल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नवीन आलेल्या या लालपरी गाड्यांचे पूजन व लोकार्पण आमदार पाटील यांच्याच हस्ते चंदगड आगारात करण्यात आले.
स्वागत आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी केले. यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक विशाल शेवाळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे, माजी जि प सदस्य सचिन बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, अन्य आगारांचे प्रतिनिधी, अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पत्रकार यांची उपस्थिती होती.
आगारात आलेल्या नवीन बसेस चंदगड येथून कोल्हापूर, गडहिंग्लज, अक्कलकोट या मार्गावर धावणार असल्याने भागातील नागरिकांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. या बसेस मध्ये जीपीएस प्रणाली, आरामदायक आसन व्यवस्था, स्वच्छता व प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment