गोकुळ मध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठा - सतेज पाटील यांच्याकडून सूचना - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2025

गोकुळ मध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठा - सतेज पाटील यांच्याकडून सूचना

 


कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा

    कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची आज निवड झाली. या निवडीनंतर नविद मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. निवडीबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळात गोकुळमध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठा आणि त्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करा अशी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली.

        यावेळी माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, राजूबाबा आवळे, गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी), युवराज पाटील (बापू) , जि.प. माजी अध्यक्ष राहूल पाटील- सडोलीकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, सौ.स्मिता गवळी, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, प्रा.किसन चौगले, बयाजी शेळके आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment