![]() |
जय जवान दूध संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल संजय पाटील यांचे स्वागत करताना माजी चेअरमन महादेव पाटील |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील जय जवान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या चेअरमनपदी संजय केदारी पाटील यांची तर व्हा चेअरमनपदी सौ साधना नारायण पाटील यांची निवड झाली.
माजी आमदार राजेश पाटील गटाच्या या दूध संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत चेअरमन पदासाठी संजय पाटील यांचे नाव संचालक सुनिल पाटील यानी सुचवले तर संचालक दिपक पाटील यानी अनुमोदन दिले. यावेळी ब्रम्हलिंग दूध संस्थेचे चेअरमन संजय गडकरी, अशोक पाटील, प्रा. गुरुनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, मारुती पाटील ,पी डी भिंगुडे, राजेंद्र भिंगुडे, माजी चेअरमन महादेव पाटील, मनोहर भिंगुडे, नारायण गडकरी, तानाजी कुंभार, विश्वास कांबळे, सौ. सुजाता पाटील आदी संचालक सचिव पिराजी हेंडोळे व मान्यवर उपस्थित होते. सभासदांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून संस्थेची प्रगती व सभासदांच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी चेअरमन संजय पाटील यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
No comments:
Post a Comment