कुदनूर येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2025

कुदनूर येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने वृक्षारोपण

कुदनूर येथे वृक्षारोपन करताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ

कुदनुर / सी एल वृत्तसेवा
    कुदनुर (ता. चंदगड) येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने वृक्षरोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ, पिंपळ, वड चाफा अशा १२५ झाडांची लागवड श्री सिध्देश्वर मंदिर, स्मशानभूमी परिसरात लागवड करण्यात आली.
   यासाठी ओलम शुगर कारखाना, गावातील व्यापारी व ग्रामस्थानी सहकार्य केले. या वृक्षारोपन कार्यक्रमासाठी उपसरपंच अशोक गवंडी, मंडळाचे कार्यकर्ते विनायक आंबेवाडकर, सचिन बामणे, संतोष नौकुडकर, अनिल आंबेवाडकर, राजू खंडू गावडे, सचिन खंडाळे, सुधीर बेळगांवकर, मोहन नुलेकर, जयराम पाटील, सागर आंबेवाडकर, प्रवीण गवेकर, मारुती होळकर, तनुजा हेब्माबाळकर, रुती मुतकेकर, विठ्ठल आंबेवाडकर, सचिन खंदाळे , मोहन नुलेकर, संतोष बामणे , प्रकाश कसलकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment