माडखोलकर महाविद्यालयात जागतिक ज्ञान- साधना योग दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2025

माडखोलकर महाविद्यालयात जागतिक ज्ञान- साधना योग दिन उत्साहात


चंदगड / सी एल वृत्तसेवा

  येथील र. भा. माडखोलकर  महाविद्यालयात जागतिक ज्ञान- साधना योग दिन उत्साहात पार पडला. 
 महाविद्यालयाच्या एस. एन. पाटील सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागप्रमुख योगगुरु डॉ. पी. एल. भादवणकर व हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व विशद करून प्रात्यक्षिके सादर केली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगामुळे तंदुरुस्त होण्याबरोबर  स्मरणशक्ती वाढते यासाठी नियमित योगा करण्याचे आवाहन यावेळी डॉ.भादवणकर व डॉ.पाटील यांनी केले,
 महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस डी. गोरल यांनी सर्वांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. आभार प्रा. ए. डी. कांबळे यांनी मानले. या योग दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment