![]() |
झांबरे प्रकल्प मुसळधार पावसामुळे ओव्हरप्लो झाला आहे. त्याच्या सांडव्यावरुन वाहणारे पाणी. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेली पावसाची संततदार वाढतच चालली असल्याने चंदगड तालुक्यातील नदी ओढ्यांवरील मोऱ्या व बंधारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.
रविवारी रात्रीपासून सुरू झालेली पावसाची शांतता आज मंगळवार दि. २४/०६/२०२५ च्या सायंकाळपर्यंत जोरदार सुरू असल्याने तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. जांबरे- उमगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने जांबरे मध्यम प्रकल्प आज सायंकाळी सहा वाजता १०० % भरून ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी नदीपात्रात पाणी पातळी तुफानी वेगाने वाढत असून ताम्रपर्णी नदीलगतच्या सर्व गावांतील नागरिक व शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील बिजूर-भोगोली, खेळणी बंधाऱ्यावर पाणी आल्याने येथून वाहतूक मार्ग बंद करण्यात आला आहे. याशिवाय अडकूर, कानडी, सावर्डे, हिंडगाव, कुर्तनवाडी, हल्लारवाडी आदी बंधाऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक खंडित झाली आहे.कोवाड येथील ताम्रपर्णी नदीच्या पाण्याची सद्यस्थिती
दरम्यान ताम्रपर्णी नदीवरील झांबरे मध्यम प्रकल्प आज रात्री ओव्हरफ्लो झाल्याने तसेच पावसाचा जोर अधिकच वाढल्याने पूर्व भागातील ताम्रपर्णी नदीकाठच्या कोवाड व्यापारी पेठेतील व्यापारी बंधूंनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. किंबहुना महापुराच्या भीतीने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment