चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा चंदगडचे विद्यमान अध्यक्ष व मराठी विद्यामंदिर माडवळे (ता. चंदगड) शाळेचे मुख्याध्यापक धनाजी कृष्णा पाटील हे आपल्या ३७ वर्षाच्या शैक्षणिक सेवेतून दि. ३० जून २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. या निमित्त त्यांचा सपत्नीक गौरव समारंभ रविवार दि. २२ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्वराज्य मल्टीपर्पज हॉल बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्ग मजरे कार्वे, ता. चंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा सुबराव पाटील हे भूषवणार आहेत.
आमदार शिवाजीराव पाटील व चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पाटील यांच्या हस्ते पाटील दांपत्याचा सत्कार होणार असून यावेळी माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुरेश कोळी, शिक्षक समिती राज्याध्यक्षा वर्षा केनवडे, राज्य नेते ज्योतीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी विद्यामंदिर माडवळे, ग्रामस्थ कार्वे व प्राथमिक शिक्षक समिती शाखा चंदगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment