योगदिनानिमित्त प्रात्यक्षिक करताना विद्यालयातील मुले व मुली.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) येथील भावेश्वरी विद्यालयामध्ये १४ व्या योगदिन व वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम झाला. शालेय समितीचे चेअरमन रामाणा पाटील प्रमुख उपस्थित होते.
![]() |
वृक्षारोपण करताना विद्यालयातील मुले, मुली, शिक्षक व शालेय समितीचे चेअरमन व सदस्य |
यावेळी मुख्याध्यापक यू. एल. पवार यांनी जीवनात योगाचे महत्त्व सांगितले. अध्यापक. पी. एम.कांबळे यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करुन घेतली. त्यानंतर 'एक पेड माॅं के नाम ' या उपक्रमांतर्गत शालेय समिती चेअरमन रामाणा पाटील, शालेय समिती सदस्य ॲड. संतोष मळवीकर, प्र. मुख्याध्यापक यू. एल. पवार, अध्यापक पी. एम. कांबळे, अध्यापक डी. जी. पाटील व अध्यापिका सौ. एस. आर. कोरवी यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थ्यी-विद्यार्थिनी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
No comments:
Post a Comment