चंदगड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी, आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2025

चंदगड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी, आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

 


आजरा / चंदगड : सी एल वृत्तसेवा
        कोल्हापूर जिल्हापासून दूर असलेल्या चंदगड तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे. या उद्देशाने आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शुक्रवारी) चंदगड तालुक्यात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत चंदगड तालुक्यातील शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागले. 
          या बैठकीला शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, वेतन पथक अधीक्षक प्रवीण फाटक, बी. जी. काटे, पी. आर. पाटील, शांताराम गुरबे, के. बी. पाटील, एम. आर. भोगुलकर, पी. जे. मोहनगेकर, प्राचार्य श्री. कदम, यांच्यासमवेत विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
        प्रारंभी आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाधिकारी सावंत आणि वेतन पथक अधीक्षक फाटक यांच्याकडून चंदगड तालुक्यातील प्रलंबित कामाचा आढावा घेतला. चंदगड तालुक्यातील थकीत मेडिकल बिले, पीएफ स्लिप, प्रलंबित शालार्थ आयडी, विनाअनुदानितकडून अनुदानीतकडे बदली तसेच अनुकंपा प्रस्तावाची कामे वेळेत निर्गमित करण्याचे आदेश दिले. 
    जी कामे पुणे शिक्षण आयुक्त, संचालक स्तरावर होती, ती सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले. काही शिक्षक बांधवांनी शिक्षणाधिकारी व वेतन पथक स्तरावरील आपले वैयक्तिक प्रश्न घेऊन या बैठकीत सहभागी झाले होते. हे प्रश्न देखील आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गी लावले. अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी, त्यांची कामे तात्काळ मार्गी लावावीत, अशा सक्त सूचना आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
    यावेळी चंदगड, आजरा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून आमदार जयंत आजगांवकर, शिक्षणाधिकारी  यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांचीही उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment