चंदगड : दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2025

चंदगड : दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान उत्साहात

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    येथील दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेले रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अत्यंत प्रभावी आणि माहितीपूर्ण ठरले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अधिकारी प्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांना रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक नियमांची सखोल माहिती दिली.


    त्यांनी सिग्नलचे पालन, वाहनाच्या वेगावर नियंत्रण, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, तसेच वाहन चालविताना आवश्यक काळजी घेण्याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरे देत गैरसमज दूर केले. ‘शंभर दिवस, शंभर शाळा’ या विशेष मोहिमेअंतर्गत राजेंद्र किरमटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहतुकीविषयी जनजागृती केली व सर्वांनी सामूहिकपणे रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेतली.

    कार्यक्रमास उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, परिवहन समिती अध्यक्ष जे. जी. पाटील, ज्येष्ठ अध्यापक व्ही. के. गावडे, टी. व्ही. खंदाळे, प्रकाश पाटील, सचिन पाटील, ओंकार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी केले.

No comments:

Post a Comment