चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
इसापुर (ता. चंदगड) येथील आरोग्य केंद्राच्या झालेल्या दुरावस्थेबाबत विधानसभेत चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे आवाज उठवला. लवकरात लवकर हे आरोग्य केंद्र सुव्यवस्थीतपणे सुरु करावे अशी मागणी केली.
इसापुर येथे असलेल्या आरोग्य केंद्राची पुर्णपणे दुरावस्था झाली असून तब्बल १५ वर्षे या आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर, परिचारिका उपलब्ध नाही. आजुबाजूच्या ६ गावांतील नागरिकांचे आरोग्य या केंद्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग पुर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असल्याचे जाणवत आहे. या आरोग्य केंद्रास खंडराचे स्वरुप प्राप्त झाले असून इमारत मोडकळीस आली आहे, आजुबाजुला गवत वाढले आहे. त्यातच येथे अवैध कारनामे सुध्दा घडत आहेत. त्यामुळे मंत्रीमहोदय, संबंधित विभागांचे अधिकारी यांनी लक्ष घालून लवकरात लवकर येथे आरोग्य कर्मचारी, औषधे व इतर सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी केली.
No comments:
Post a Comment