![]() |
शिवाजी पाटील |
चंदगड / सी. एल. न्यूज वृत्तसेवा
चोकाक (ता. हातकणंगले) येथील श्री स्वामी समर्थ रोपवाटीकेचे प्रमुख शिवाजी आकाराम पाटील यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देवभूमी राष्ट्रीय रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
इन्स्टीट्यूट फॉर सोशल रिफॉर्मस ॲन्ड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट उत्तरप्रदेश यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5 जुलै रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. या ट्रस्टच्यावतीने देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. शाहू कृषी विद्यालय ,कोल्हापूर येथून कृषी पदविका पूर्ण करून शिवाजी पाटील यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता शेतीमध्ये नवनवे प्रयोग केले. याचबरोबर कोल्हापूर- सांगली मार्गालगत चोकाक येथे श्री स्वामी समर्थ रोपवाटीका सुरु केली. याचबरोबर शिरढोण व धरणगुत्ती तालुका शिरोळ व हरिपूर तालुका मिरज जिल्हा सांगली व नारायणगाव जिल्हा पुणे ऊस रोपवाटिकेच्या शाखा सुरू केल्या आहेत.या रोपवाटीकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची ऊस रोपे उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते अविरतपणे करीत आहेत. खडकाळ माळावर त्यांनी प्लास्टिक ट्रे ऊस रोप उपक्रम यशस्वी केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते हे सिद्ध केले आहे. आजवर कित्येक प्लॉट वर त्यांनी पुरविलेले ऊस रोपे ही शेतकऱ्यांना उच्चांकी गाळपाचे उत्पादन देत आहेत.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
फोटो - शिवाजी पाटील
No comments:
Post a Comment