सकल मराठा समाजाची २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2025

सकल मराठा समाजाची २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे बैठक

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी २७ ऑगस्ट २०२५ रोजी चलो मुंबईचा नारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील समाज बांधव ताकतीने या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होणार आहेत. या संदर्भात सकल मराठा समाजाची नियोजन बैठक शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता शिवाजी मंदिर, शिवाजी पेठ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मराठा समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी व न्याय लढ्यात आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्हा यांच्याकडून करण्यात आले आहे.  एकच मिशन मराठा आरक्षण, अभी नही तो कभी नही.


No comments:

Post a Comment