चंदगड : सी एल वृत्तसेवा
प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय एवं समाजसेवा प्रभाग, शाखा चंदगड, वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर, शाखा गडहिंग्लज यांच्या वतीने विश्वबंधुत्व दिन व राजयोगिनी दादी प्रकाश मणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत हे शिबिर चंदगड शिक्षक कॉलनी चंदगड येथे होणार आहे. 'रक्तदान करूया आणि प्रेमाचे नाते जोडूया' हे ब्रीदवाक्य घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन ब्रह्माकुमारी चंदगड सेंटरच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment