कडलगे खुर्द सेवा सोसायटीच्या वार्षिक सभेत दिपप्रज्वलन करताना चेअरमन व संचालक
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील आदर्श विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित कडलगे खुर्द या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन नारायण लक्ष्मण कांबळे होते. दिप प्रज्वलन संस्थेचे जेष्ठ सभासद जानबा जिवबा पाटील व विठ्ठल नागोजी पाटील यांच्या हस्ते झाले.
तसेच संस्थेचे दिवंगत सभासद, पहेलगाम व गुजरात अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले नागरिक, शहिद सैनिक व थोर शास्ञज्ञ यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन कांबळे सर यांनी केले. त्यांनी अहवाल सालात संस्थेला ५ लाख ३७ हजार ४९८ रुपये इतका नफा झाला असून सभासदांना ७ टक्के डिव्हिडंट देणार असल्याचे जाहीर केले. संस्था सचिव सुरेश नागोजी पाटील यांनी अहवाल वाचन केले. यावेळी झालेल्या चर्चेत अरूण पाटील, संदिप बिर्जे, पुंडलिक पाटील, जी. डी. पाटील, गुलाब पाटील आदींनी भाग घेतला. संचालक शिवाजी नागोजी पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment