चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील संजीव पांडूरंग पाटील (वय-६०) यांचे शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक दुखःद निधन झाले. कुलदैवत सेवा सोसायटी धुमडेवाडीचे विद्यमान संचालक व धुमडेवाडीतील लक्ष्मी दुध संस्थेचे ते संस्थापक होते. ते अत्यंत प्रेमळ, सतत आनंदी व हसतमुख राहणारे व मनमिळाऊ व्यक्तीमत्व होते.
खेडूत शिक्षण मंडळ संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगडचे प्राचार्य आर. पी. पाटील, देवाप्पा पाटील व मनोहर पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी दि. १८ रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment